बापू, तुम्ही ग्रेटच ! डॉ. सोनिया कस्तुरे १२ फेब्रुवारी २०२६

बापू, तुम्ही ग्रेटच ! हा, चरखा आणि गांधीजींचा मुक्त संवादात्मक दिर्घ कविता संग्रह नुकताच ६ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रकाशित झाला. ज्येष्ठ साहित्यिका व संवेदनशील कवयित्री माननीय नीलमताई माणगावे यांनी वास्तवदर्शी व खऱ्या खुऱ्या घडामोडींवर आधारलेला हा काव्यसंवाद अतिशय कल्पकतेने आणि सखोल अभ्यासपूर्ण मांडला आहे. या संवादातून सद्य परिस्थितीत, राजकारण, धर्मकारण, समाजकारण, जातीय दंगली, धार्मिक द्वेष यामुळे निर…